कोविड 19 पूर्वी विधवापण आलेल्या महिलांची नावे मिळकत हस्तांतरण शिबिरात समाविष्ठ करा – राजू मिसाळ
पिंपरी (प्रतिनिधी – कोरोना -१९ पुर्वी विधवा झालेल्या महिलांचे नावे “मिळकत हस्तांतरण शिबीर” यामध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केली आहे.
यासंदर्भात आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, उपरोक्त विषयान्वये मनपाच्या करसंकलन विभागाकडील कोरोना -१९ किंवा अन्य कारणाने विधवा झालेल्या महिलांचे नावे मिळकत हस्तांतरण करणेकामी शिबीर आयोजीत करणेत आलेले आहे. या शिबीरामध्ये कोरानानंतरच्या कालावधीतील विधवा महिलांचे नावे मिळकत हस्तांतरीत करणेत येत आहे.
परंतु, या शिबीरामध्ये कोरोनापूर्वी विधवा झालेल्या महिलांचे नावे मिळकत हस्तांतरण करणेत येत नाही. शहरामध्ये कोरोनापुर्वी अन्य कारणाने विधवा झालेल्या महिलांचे प्रमाणही लक्षणीय आहे. कोरोना पुर्वी विधवा झालेल्या महिलांचे नावे मिळकत हस्तांतरण करुन घेतले तर अशा महिलांना दिलासा व आधार मिळेल, मनपा कडे मिळकत कर ही जमा होवु शकेल.
शिबीराचा कालावधी पाच दिवसाचा असल्याने अधिकृत कागदपत्रे, मुत्यू दाखला, ओळखपत्र ईत्यादी जमा करणे विधवा महिलांना जिकरीचे व अडचणीचे होत आहे. शिबीर कालावधीमध्ये वाढ करणेत यावी जेनेकरुन जास्तीत जास्त विधवा महिलांना या शिबीराचा उपयोग होईल.
तरी आपणास विनंती आहे की, कोरोना पुर्वी अन्य कारणाने विधवा झालेल्या महिलांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातुन मिळकत हस्तांतरण करणे तसेच शिबीर कालावधी मध्ये वाढ करणेबाबत संबधीत विभागांना आदेश निर्गत करणेत यावे.