चिंचवड येथील एम्पायर स्क्वेअर सोसायटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस

  • नगरसेविका तथा सभापती अनुराधा गोरखे यांचा पुढाकार

पिंपरी (प्रतिनिधी) – मोरवाडी चिंचवड प्रभाग क्रमांक  10 मधील एम्पायर स्क्वेअर सोसायटी मधील जेष्ठ नागरिकांना बुस्टर डोस तर लहान मुलांना कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. नगरसेविका व शहर सुधारणा सभापती अनुराधा गोरखे यांनी या कॅम्पचे आयोजन केले होते. त्यांच्या हस्ते व प्रदेश सचिव अमित गोरखे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

मोरवाडी चिंचवड येथील लसीकरण YCM हॉस्पिटल च्या मदतीने आयोजित करण्यात आले होते. वॅक्सीनेशनसाठी डॉ. अमिता भट्टड (एमओ), जयश्री मिडगुले (स्टाफ नर्स), करुणा समुद्रे (स्टाफ नर्स, प्रणाली तेलगोटे (स्टाफ नर्स), वैष्णवी सरोदे (स्टाफ नर्स), अलका भणगे (डीइओ)

एम्पायर स्क्वेअर जेष्ठ नागरिक संघ तर्फे प्रा. सदानंद बोगम, सुवालाल मुथ्था, नेमिचंद जैन, सुशीलकुमार गोयल, विजय गुप्ता, प्रदीप तळेकर, विलायतीराम आगरवाल, रामकुमार आगरवाल, शंभूशेठ तोडी, जगन्नाथ तरटे, तुकाराम शेळके, मधुकर जोशी, अतुल शहा, शेखरबाबू घेवारे, विनीत कदम, अजय लड्डा, सुशीलकुमार गोएल व इतर सर्व जेष्ठ नागरिकांनी लसीकरण मोहीम यशस्वी पार पडण्यासाठी अहोरात्र काम केले.


भाजपाचे प्रदेश सचिव गोरखे यांनी कार्यक्रमाचे नियोजनात मदत केली.

Share to