आमदार अण्णा बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली BRSPच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
पिंपरी – स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सानिमित्त रविवारी 15 ऑगस्ट 2022 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पिंपरी-चिंचवड सामाजिक न्याय सेलमध्ये BRSP च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. आमदार अण्णासाहेब बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच सामजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल, सामजिक न्याय विभागाच्या महिलाध्यक्षा गंगा धेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागात प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार,विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा.अजितदादां पवार, आमदार अण्णासाहेब बनसोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व त्यांच्या कार्यशैली ने प्रभावित होऊन बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अध्यक्ष बाळासाहेब भालेराव, मंजुषा गायकवाड. महीलाध्यक्षा. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, रमेश शिंनगारे, उपाध्यक्ष, धनंजय वैरागे, रोशन सोनवणे, बाबू साबळे, रघु गव्हाळे, सनी कांबळे लखन कांबळे आकाश शिंदे शुभम शिंदे शिवकुमार बनसोडे अल्ताफ नदाफ यांच्या सह हजारो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सामाजिक न्याय विभागात प्रवेश केला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच सर्व समाजातील घटकांना व सामान्य माणसाला न्याय देऊ शकतो हा विश्वास यावेळी पक्ष प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांनी केला.यावेळी आमदार अण्णा बनसोडे यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले व सर्वांनी एकत्रित सामाजिक उन्नती साठी प्रयत्न करूयात असा विश्वास दिला