‘चिंचवड विधानसभेत प्रकाश कुणाचा? फक्त मशालीचा’

  • आक्रमक शिवसैनिकांची उद्धव साहेबांना साद..
  • चिंचवड मतदारसंघ ठाकरे गटाकडेच रहावा; बैठकीत एकमत… 


चिंचवड (दि. २९) :- कुठल्याही परिस्थितीत चिंचवड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाकडेच रहावा, यासाठी शिवसैनिकांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. त्यासाठी आज रविवारी (दि. २९) रोजी) शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची वाल्हेकर वाडी येथे बैठक झाली. चिंचवड विधानसभा मतदारसंघ फक्त मशाल चिन्हावरच लढविण्याचा निर्धार यावेळी शिवसैनिकांनी बैठकीत केला आहे. लवकरच पक्षाचं एक शिष्ठमंडळ उद्धव साहेबांची भेट घेऊन त्यांच्याकडे आग्रही मागणी करणार असल्याची माहिती चिंचवड विधानसभेचे शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

बैठकीला पिंपरी चिंचवड शहर संघटिका अनिता तुतारे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोर्‍हाळे, शहर संघटक संतोष सौंदणकर, उपशहरप्रमुख संतोष पवार, नवनाथ तरस, हरेश नखाते, उपशहर संघटीका ज्योती भालके, योगिनी मोहन, विभाग प्रमुख संदीप भालके, गोरख पाटील, शिवाजी पाटील, मच्छिंद्र देशमुख, किरण दळवी, कुदरत खान, सचिन चिंचवडे, नितीन दर्शिले, विभाग संघटिका सुजाता नखाते, वैशाली काटकर, उपविभाग प्रमुख कलावंती नाटेकर, विभाग संघटक अमित दर्शले, युवासेना उपशहर प्रमुख भाऊसाहेब जाधव, युवासेना विभाग प्रमुख विनायक दळवी, शाखाप्रमुख मज्सिद शेख, युवराज अहिरे, जगदीश काटे आदी उपस्थित होते

बैठकीत विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे यांनी मुद्दा उपस्थित केला. शहर संघटिका अनिता तुतारे यांनी अनुमोदन दिले. चिंचवड मतदारसंघात ‘फक्त मशालीचाच प्रकाश पडण्यास सज्ज आहात का?’ असे त्यांनी आवाहन करताच शिवसैनिकांनी घोषणा देत समर्थन दिले. चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. भाजप-शिवसेना एकत्र असतानासुध्दा शिवसेनेनेच या मतदारसंघातून अधिकृत उमेदवार देत निवडणूक लढवलेली आहे. त्यामुळे आमचा या मतदारसंघावर प्रथम हक्क आहे. हे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी विसरू नये. एकसंघ असलेल्या शिवसेनेचे पिंपरी चिंचवड महापालिकेत ९ नगरसेवक होते. त्यातील बहुतांशी नगरसेवक हे शिवसेना उद्धव साहेबांच्या पक्षासोबत कायम आहेत. शहरातील बहुतांश माजी नगरसेवक पक्षाशी एकनिष्ठ आहेत. त्यांनी तसेच, शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी जीवाचे रान करीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली होती. मतदार संघातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना असलेली सहानुभूतीची लाट नक्कीच विजयश्री खेचून आणेल, अशी आम्हाला खात्री आहे. त्यामुळे उद्धव साहेबांची भेट घेऊन आमची खदखद त्यांच्या कानावर लवकरच घालणार असल्याचा संकल्प यावेळी शिवसैनिकांनी सोडला आहे, अशी माहिती संतोष सौंदणकर यांनी दिली आहे.

Share to