नवनिर्वाचित सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांचा सन्मान
पिंपरी- सन्मान युवा प्रतिष्ठान च्या वतीने आज पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील नव्याने पदभार स्वीकारणारे नवनिर्वाचित सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांचा पोलीस आयुक्तालयात यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी युवा सेना शहर संघटक निलेश हाके, सन्मान युवा प्रतिष्ठान अध्यक्ष अविनाश जाधव, कार्यअध्यक्ष मनोज काची, खजिनदार चिंचपा लिंगडोळे आदी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड शहरातील जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी चांगल्या अधिकाऱ्याच्या पाठीशी सदैव राहत आलो. आमचा पण समाजशील कामामध्ये पाठिंबा राहील. तसेच जबाबदार पदावर असताना प्रसंगी घेतलेला आपला कठोर निर्णय सामान्य लोकांचे हित पाहून आम्ही पाळू. गुन्हेगारीमुळे विस्कटलेली घडी नीट बसवा, अशी विनंती शहर संघटक निलेश हाके यांनी केली. तसेच, पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.