पिंपरी-चिंचवड हाफ मॅरेथॉनची तारिख ठरली, पिंपळे सौदागरमध्ये होणार स्पर्धा

पिंपरी | महाईन्यूज

येत्या 5 डिसेंबर 2021 रोजी पिंपरी-चिंचवड हाफ मॅरेथॉन स्पर्धा होणार आहेत. पिंपळे सौदागर येथे ही स्पर्धा होणार आहे. 5, 10 आणि 21 किलोमीटर अशी तीन प्रकारात ही स्पर्धा होणार आहे. विजेत्यांना रोख बक्षिस मिळणार असून सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात येणार आहेत.

सहभागी स्पर्धकांना टि-शर्ट, वेळेचे प्रमाणपत्र, फिनिशर मेडल, गुडी बॅग, झुंबा सेशन, आरोग्यदायी नाश्ता, मोफत फोटो आणि मॅरेथॉन मार्गासाठी सहकार्य केले जाईल. तर, विजेत्यांना रोख रक्कम बक्षीस दिले जाणार आहे. रस्ते सुरक्षा ही या मॅरेथॉनचा उद्देश आहे.

पिंपरी चिंचवड हाफ मॅरेथॉनसाठी नोंदणी आवश्यक असून, त्यासाठी नोंदणी शुल्क आकारले जाणार आहे. यामध्ये 5 कि.मी. साठी 800, 10 कि.मी. साठी 1200 आणि 21 कि.मी. साठी 1500 रूपयांचे नोंदणी शुल्क असेल.

खालील लिंकवर जाऊन आपल्या नावाची नोंदणी करा –

https://www.townscript.com/e/pimpri-chinchwad-half-marathon-2021
Share to