अतिक्रमण कारवाईपूर्वी दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी येथे हॉकर्स झोन करा – पिंपरी युवासेना
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ह’ प्रभागांतर्गत दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी येथे महापालिकेच्या वतीने गोरगरीब दुकानदार, पथारीधारक व व्यवसायिक वर्ग यांच्यावर अतिक्रमण कारवाई सुरू आहे.
एकीकडे कोरोना काळात आपले उद्योगधंदे गमावलेले गोरगरीब नागरिक छोटा-मोठा व्यवसाय करत आहेत. कसाबसा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करीत असताना महापालिकेच्या वतीने यांच्यावर कारवाई करणे योग्य नाही. कारवाई करण्यापूर्वी महापालिकेने सर्वांची अधिकृत नोंदणी करून घ्यावी. शहरात हॉकर्स झोनची निर्मिती करावी. त्यानंतरच अवैध व अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी पिंपरी युवासेनेचे युवाअधिकारी निलेश हाके यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना निवेदन दिले आहे.