बाळासाहेबांचा वसा पुढे नेणारी वेताळनगर शाखा दुसऱ्या क्रमांकावर – अॅड. वैभव थोरात
- पाणपोई, वाचनालयाचे लोकार्पण व जेष्ठ शिवसैनिकांचा वेताळनगरमध्ये सत्कार
पिंपरी (प्रतिनिधी) – चिंचवडगांवातील वेताळनगर शिवसेना शाखेच्या वतीने शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहेर, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड विधानसभा संघटक संतोष सौंदणकर यांच्या पुढाकाराने रविवारी (दि. १९) रोजी पाणपोई, वाचनालयाचे लोकार्पण व जेष्ठ शिवसैनिकांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पिंपरी-चिंचवड विधानसभेचे संपर्कप्रमुख तथा सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात, पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख अॅड. सचिन भोसले, शहर संघटिका अॅड. उर्मिला काळभोर, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, संघटिका सरिता साने, सुधाकर नलावडे, दिलीप भोंडवे, विभाग प्रमुख राजेश आडसूळ, संदीप भालके, माऊली जगताप, महेश कलाल, मुस्ताक शेख, रमेश शेंडगे, बाबुशा अविचते, जगन्नाथ कराडकर, महादेव शिंदे, आकाश बोराडे, अनिल बोराडे, पांडुरंग अडागळे, काशिनाथ साठे, नामदेव माने, बसवराज जमखंडी, विधार्य सुर्वे, रफिक बेग, सुनील मोरे, शैला पाचपुते, मयुरी सावंत, शैलानी निकम, नसरीन शेख, तसलीम शेख आदी शिवसैनिक उपस्थित होते. याप्रसंगी अॅड. वैभव थोरात यांच्या हस्ते शिवाजी तांबे, महेंद्र तेलंगी, रफिक बेग, नामदेव पवार, सुग्रीव अडागळे, दीपक शिंदे या जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला.
अॅड. वैभव थोरात म्हणाले, शिवसेनेची ओळख ही ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण अशी आहे. सामाजिक कार्याच्या माध्यमातूनच पक्ष मोठा होतो. आमच्या पक्षात शाखांना ऑक्सिजनइतके महत्व असून शाखा मजबूत तर पक्ष मजबूत, अशी उद्धवसाहेबांची विचारधारणा आहे. शिवसेनेच्या वेताळनगर शाखेचा पिंपरी चिंचवड शहरात दुसरा क्रमांक लागतो. पक्षाचे माजी नगरसेवक वसंत तेलंगी यांसारख्या मावळ्याच्या कार्यामुळेच आजही शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग येथे आहे. या शाखेमधूनच अनेक शिवसैनिकांचा उदय झाला. हा वसा यापुढेही चालू ठेवण्याचे कार्य येथील बाळासाहेबांचे व उद्धवसाहेबांचे मावळे करतील.
कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना शहर संघटक संतोष सौंदणकर, विभागप्रमुख सचिन चिंचवडे, शाखाप्रमुख माजित शेख, उपविभाग प्रमुख कुदरत खान, किशोर सातपुते यांनी तर, प्रास्ताविक कुदरत खान यांनी केले. आभार किशोर सातपुते यांनी मानले.