कर्नाटक : बंगळुरूतील शिवाजी महाराज पुतळा विटंबनच्या निषेधार्त भाजयुमो मैदानात, पिंपरी चौकात आंदोलन

  • महाराजांची विटंबना हिंदू माणूस कदापी सहन करणार नाही – अनूप मोरे
  • ‘शिवराय’ आमची प्रेरणा, प्रेरणास्थानाची विटंबना निंदनीय बाब – संकेत चोंधे

पिंपरी (प्रतिनिधी) – हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटक येथील बंगळुरू येथे काही समाजकंटकांनी विटंबना केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे हिंदुस्तानच्या अस्मितेचा भाग आहेत. या अस्मितेला धक्का लागला तर देशाच्या कानाकोप-यातील तमाम हिंदू माणूस ते कदापी सहन करणार नाही, असा इशारा भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष अनूप मोरे यांनी दिला. तर, महाराजांच्या पुतळ्याची विटंबना अत्यंत निदंनीय बाब आहे, असे म्हणत भाजयुमो शहराध्यक्ष संकेत चोंधे यांनी या घटनेचा तिव्र निषेध केला.

पिंपरी-चिंचवड भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात या घटनेच्या निषेधार्त तिव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष तथा युवा वॉरियर्सचे प्रदेश संयोजक अनुप मोरे, निलेश यादव, दीपक नागरगोजे आदी उपस्थित होते.

भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष अनूप मोरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. चहुबाजूंनी मुघलांचा जुलमी आतिरेक असताना महाराजांनी रयतेच्या रक्षनासाठी बहुजनांची मोट बांधली. रंजलेल्या, गांजलेल्यांना ताकद दिली. त्यांच्यातील स्वाभिमान जागा केला. स्वराज्याच्या रक्षनासाठी मुघलांसोबत दोनहात करण्याचे शैर्य त्यांच्यात निर्माण केले. महाराजांनी हिंदुस्तानातील सामान्य मानसाची काळजी घेतली. म्हणून त्यांना रयतेचा राजा म्हटले जाते. अशा महान युगपुरूषाच्या पुतळ्याची प्रतारणा हा देश कदापी सहन करणार नाही. या घटनेचा मी तिव्र निषेध करतो.   

शहराध्यक्ष संकेत चोंधे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आमच्या अस्मितेचा विषय आहेत. महाराज तमाम हिंदुंचे प्रेरणास्थान आहेत. आमच्या प्रेरणास्थानाची विटंबना करणा-या समाजकंटकांच्या कर्नाटक सरकारने मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. हिंदुस्तानच्या आस्मितेची विटंबना करणे अतिशय निंदनिय आहे. भाजयुमो या घटनेचा तिव्र निषेध करीत आहे. यापुढे कर्नाटक राज्यात अशा निंदनिय घटना घडल्या तर भाजयुमो कदापी सहन करणार नाही, असा इशारा देखील चोंधे यांनी दिला.   

Share to