प्रभाग क्रमांक 4 मध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा धडाका

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत प्रभाग क्रमांक 4 मध्ये अनधिकृत बांधकामांवर बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने आज कारवाई केली. या कारवाईत एकूण 12 अनधिकृत आरसीसी व वीटांची बांधकामे पाडण्यात आली. असे एकूण 7811.76 चौरफ फुटाच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली.  

Share to