पिंपरी-चिंचवडमध्ये आज ओमायक्रॉनचे नवीन चार रुग्ण, 23 जणांनी केली मात

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवडमध्ये आज ओमायक्रॉनचे नवीन चार रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये दोन महिला, एक पुरूष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. त्यातील एक जपान, एक थायलंड, एक अफ्रिका येथून आलेले आहेत. एकजण रँण्डम तपासणीत ओमायक्रॉन पॉझीटिव्ह आढळला आहे. त्यांना उपचारासाठी भोसरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ओमायक्रॉन संक्रमणाचा फैलाव होत असल्यामुळे केंद्र व राज्य सरकारने खबरदारीच्या उपाययोजना घालून दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने ही आवश्यक उपाययोजना आखून दिल्या आहेत. त्यानुसार आज (दि. 29) शहरामध्ये परदेशातून आलेल्या नागरिकांमध्ये 4 रुग्ण पॉझीटिव्ह आढळले आहेत. भोसरी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ओमायक्रॉन विषाणुचे संक्रमण होऊ लगल्यानंतर केंद्र व राज्य सरकारने उपाययोजना लागू केल्यापासून आजपर्यंत परदेशातून आलेल्या व त्यांच्या संपर्कात आलेल्या एकूण 1 हजार 539 नागरिकांची नोंद करण्यात आली आहे. त्यातील 31 जण पॉझीटिव्ह आढळले होते. त्यांच्यातील 13 जण ओमायक्रॉन पॉझीटिव्ह निघाले. त्यांच्या संपर्कात आलेल्या 26 जणांची तपासणी केली असता त्यामध्ये 9 जण पॉझीटिव्ह आले आहेत.

तसेच, रॅण्डम तपासणीमध्य एकजण पॉझीटिव्ह आला आहे. त्यांच्या आरोग्याची तपासणी करून वैद्यकीय उपचार केले असता आजअखेर 13 जण ओमायक्रॉन मुक्त झाले आहेत. परदेशातून आलेल्या एकूण नागरिकांपैकी 1 हजार 358 नागरिक निगेटिव्ह आले आहेत. कोविड व ओमायक्रॉन मुक्त रुग्णांना घरी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने जाहीर केली आहेत.

Share to