जगताप डेअरी ग्रेडसेपरेटरचे संजोग वाघेरे यांच्या हस्ते उद्घाटन
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपळे सदागर येथील जगताप डेअरी साई चौक येथील वाकड वरून पिंपळे सौदागरला येणाऱ्या ग्रेड सेपरेटर आज पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, मा. विरोधी पक्षनेते विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
यावेळी नगरसेवक मयुर कलाटे नगरसेविका शितल नाना काटे, सागर कोकणे, उद्योजक शिरीष साठे, सुमित डोळस, गौरव शितोळे, उत्तम धनवटे आदी उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षापासून नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे वा नगरसेविका शितल नाना काटे यांच्या पाठपुराव्याने या ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण करण्यात आले. या ग्रेड सेपरेटरमुळे आता या ठिकाणी होणारी वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न पूर्णपणे सुटणार आहे. विशेषतः पिंपळे सौदागरहून आयटी पार्क हिंजवडीला जाणाऱ्या नागरिकांना पूर्वी सारखी वाहतूक कोंडीची समस्या भासणार नाही.