रहाटणीत रक्तदान शिबिरात शंभर नागरिकांनी केले रक्तदान
रहाटणी (प्रतिनिधी) – रहाटणी येथील साईलीला को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शंभर नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक योगदान दिले.
रक्तदान शिबिरात आमदार लक्ष्मण जगताप,महिला बाल कल्याण समिती पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभापती नगरसेविका सविता खुळे, नगरसेवक बाबा त्रिभुवन, स्वी. सदस्य गोपाळ माळेकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे चिंचवडचे अध्यक्ष देविदास तांबे, रहाटणी विभागातील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खुळे, नरेश खुळे, गणेश नखाते, चिंचवड विधानसभा मतदार संघाचे भाजपचे प्रभारी संतोष कलाटे, नवीन लायगुडे, साईलीला सोसायटीचे अध्यक्ष राहुल मोहर, श्रीयुत गेहानी, स्वराज नागरिक पतसंस्थेचे चेअरमन सुनील कुंजीर व सोसायटीचे सभासद व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्तदान हेच श्रेष्ठदान हा मंत्र मानून रक्तदान केलेल्या प्रत्येक रक्तदात्यांना देवीदास तांबे यांच्या वतीने पेन ड्राईव्ह असलेले आकर्षक पेन सप्रेम भेट देण्यात आले.
