संत सेवालाल महाराजांचा मानवतावादी दृष्टीकोन लोककल्याणकारक – महापौर माई ढोरे
पिंपरी (प्रतिनिधी) – संत सेवालाल महाराज यांचा मानवतावादी दृष्टीकोन लोककल्याणासाठी महत्वाचा असून समाजाला प्रगतीपथावर नेण्यासाठी सतत उपयोगी पडेल, असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या प्रतिमेस यावेळी महापौर माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी शहर सुधारणा सभापती अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप आडे, रविंद्र भाट, सिताराम राठोड, सुनिल राठोड, रावसाहेब राठोड, बाबासाहेब राठोड, रवि राठोड, प्रियंका राठोड उपस्थित होते.