आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे – महापौर उषा ढोरे

पिंपरी (प्रतिनिधी) – नागरिकांनी सुदृढ व निरोगी रहाण्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे असुन आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे, असे मत महापौर  उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार निधितुन सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात खुल्या व्यायामशाळेचे ( ओपन जिम ) चे उद्घाटन महापौर  उषा उर्फ माई ढोरे यांच्या  हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी प्रभाग अध्यक्ष सागर आंगोळकर, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. कनकवले  जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स तसेच कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान, धान्यवाटप, रक्तदान व नेत्रतपासणी शिबिर असे विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत.  आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड शहराचा विकास झपाट्याने होत असुन लवकरच पिंपरी चिंचवड शहराला देशातील प्रथम क्रमांकाचे  स्वच्छ , सुंदर व निरोगी शहर म्हणुन  बहुमान मिऴेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Share to