कर्तव्यम सोशल फाऊंडेशनचे कार्य म्हणजे ‘सामाजिक परिवर्तनाची क्रांती’ – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
- कर्तव्यम प्रेरणा पुरस्कार सोहळा – २०२२ चे राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे वितरण
पिंपरी (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण भारत देश हे कार्यक्षेत्र असणाऱ्या व लोकसेवेसाठी सदैव तत्पर राहून कार्य करणाऱ्या कर्तव्यम सोशल फाउंडेशनचे कार्य हे केवळ प्रेरणादायीच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेतील नवभारत निर्माणाच्या दृष्टीने अत्यंत आशादायी आहे व सामाजिक परिवर्तनाची क्रांतिकारक वाटचाल आहे. समाजात वावरत असतांना माणूस म्हणून आपण समाजासाठी व राष्ट्रासाठी दातृत्व व कर्तृत्वाची भूमिका सदैव ठेवायला हवी आणि हीच उदात्त शिकवण कर्तव्यम सोशल फाउंडेशनच्या कार्याच्या माध्यमातून दिली जाते, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
नुकतेच राजभवन मुबई याठिकाणी पार पडलेल्या कर्तव्यम प्रेरणा संमेलन – 2022 च्या निमित्ताने केले ते बोलत होते. राजधानीच्या ठिकाणी अत्यंत दिमाखदार स्वरूपात साकार या संमेलनाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारीजी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच याप्रसंगी कर्तव्यम सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष बारणे यांची स्वागताध्यक्ष म्हणून तर कर्तव्यम सोशल फाउंडेशनचे सचिव क्रांती कुमार महाजन यांची संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थिती लाभली.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये असणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या शतकोत्तर रौप्य वर्षाच्या अनुषंगाने याप्रसंगी महामहिम राज्यपाल यांच्या हस्ते संस्थेचे सचिव व सुप्रसिद्ध लेखक क्रांती कुमार महाजन यांनी लिहिलेल्या सुभाष सिक्रेट या पुस्तकाच्या एकविसाव्या आवृत्तीचे प्रकाशन देखील करण्यात आले. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या ३६ प्रतिभावंत पुरस्कारार्थींना महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारीजी यांच्या हस्ते कर्तव्यम प्रेरणा पुरस्कार – २०२२ बहाल करून सन्मान करण्यात आला. समृद्ध, सुगम्य, सशक्त, सतेज, स्वर्णीम व स्वयंप्रकाशमान नवभारत निर्माणाकरीता प्रतिबद्ध असणाऱ्या तमाम प्रतिभावंतांच्या एकत्रिकरणातून कर्तव्यम सोशल फॉउंडेशनच्या वतीने या विशाल समारंभाचे राजभवन येथे भव्य आयोजन केल्या गेले होते. संमेलनाच्या उदघाट्नप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. संतोषजी बारणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे राधाकृष्ण प्रतिमा व मानपत्र बहाल करून स्वागत करून केले.
अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडलेल्या या संमेलनामध्ये निवडपात्र पुरस्कारार्थीमध्ये सर्वश्री डॉ. उज्वलकुमार चव्हाण, डॉ. नेमजी गंगर, डॉ. शेख अख्तर हसन अली, डॉ. अलका नाईक, सूर्यकांत गोवळे, अशोक शिंदे, डॉ. सुनील चव्हाण, सागर कवडे, यशवंत कुर्वे, भास्कर अमृतसागर, मोहम्मद रियाझ शेख, रामू पागी, सुनील सिंग, दामोदर घाणेकर, वसंतराव धाडवे, प्रतिभा भिडे, डॉ. यतीन वाघ, डॉ. वर्षा देशमुख, भाऊसाहेब कोकाटे, डॉ. किशोर पाटील, डॉ. रमेश गोटखडे, यशपाल वरठे, डॉ. सुकन्या भट, डॉ. निलय जैन, बंडू मोरे, रामदास कोकरे, सोमनाथ वैद्य, प्रमोद धुर्वे, सुरेश कोते, डॉ. अनिल रोडेv, रोशन मराठे, अविनाश आदक, जगन्नाथ शिंदे, अमित गोरखे, ज्योत्स्ना शिंदे-पवार, आशिष श्रीवास व आरती सचदेव या महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्रतिभावंतांना सन्मानित करण्यात आले.
अत्यंत सूत्रबद्ध व लक्षणीय पद्धतीने पार पडलेल्या या संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले. तर रोशन मराठे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात मोलाची भर घालणाऱ्या या कर्तव्यम प्रेरणा महासंमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संतोष बारणे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.