पाण्यासंबंधीत तक्रारी सोडविण्यासाठी महापालिकेकडून हेल्पलाईन सुरू
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढलेमुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, गढूळ पाणी, व्हॉल्व लिकेज, पाईपलाईन फुटणे इ. प्रकारच्या तक्रारी विभागास प्राप्त होत आहे. त्यानुसार आगामी काळात पाण्याच्या तक्रारी त्वरीत सोडविणेसाठी महापालिकेमार्फत २४x७ एक स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करणेत आली आहे. त्यासाठी ७७२२०६०९९९ हा हेल्पलाईन क्रमांक देणेत आलेला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रातील सर्व नागरिकांना कळविणेत येते की, पाण्यासंदर्भात आपल्या काही तक्रारी असतील त्या ७७२२०६०९९९ या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून आपल्या तक्रारी नोंदवाव्यात. सदर तक्रारीचे निरसन करणेस पाणीपुरवठा विभाग कटीबध्द आहे. आपल्या तक्रारीचे वेळेत निरसन होईल, याबाबत पाणीपुरवठा विभाग प्रयत्नशील राहील.
तसेच शहरातील नागरिकांना आवाहन करणेत येत आहे की, उपलब्ध पाणी जपून वापरावे. घरातील, इमारतींमधील, सोसायट्यांच्या आवारातील पाण्याची गळती (Leakages) बंद करावी. पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होऊ नये यासाठी काळजी घ्यावी. तसेच रस्त्यावरील दृष्टीक्षेपातील पाणी गळतीबाबत महानगरपालिकेस कळवावे.