राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
पुणे (प्रतिनिधी) – रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. रुपाली चाकणकर सध्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यपद सोडले आहे. चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवला आहे.
रुपाली चाकणकर यांच्या जागी आता राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला संधी देणार, याची उत्सुकता आहे. चाकणकर या पुण्याच्या महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा म्हणून काम पाहत होत्या. त्यानंतर त्यांना प्रदेश महिला राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा म्हणून संधी मिळाली. राज्यात २०१९ च्या विधासभा निवडणुकीच्या वेळी महिला राष्ट्रवादीच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी अचानक राजीनामा दिल्यानं त्या जागी रुपाली चाकणकर यांना संधी मिळाली होती.