शहराचा पाणीप्रश्न जातीने लक्ष घालून कायमचा मार्गी लावणार – युवासेना सचिव वरूण सरदेसाई
पिंपरी (प्रतिनिधी) – ऐन उन्हाळ्यात दापोडी फुगेवाडीसह संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील करदात्या नागरिकांना पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. प्रशासनाकडून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असूनही योग्य व मुबलक पाणीपुरवठा नागरिकांना होत नाही. प्रशासनाकडून नागरिकांच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्नावर कुठल्याही प्रकारचे नियोजन नाही. अधिकाऱ्यांना जाब विचारल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात याबाबत आपन गांभीर्याने लक्ष देत पाण्याच्या गंभीर समस्येतून नागरिकांची मुक्तता करावी याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य युवासेना सचिव वरूणजी सरदेसाई यांना पिंपरी विधानसभा युवा अधिकारी निलेश हाके यांच्या वतीने देण्यात आले त्याप्रसंगी धरणक्षेत्रात पुरेसा पाणीसाठा असूनदेखील प्रशासनाकडून याबाबत योग्य नियोजन होत नाही सदर बाब गंभीर असून त्यासाठी योग्य तो पाठपुरावा करत शहरवासियांना दररोज पाणीपुरवठा सुरु करत प्रश्न कायमचा मार्गी लावणार असे आश्वासन देण्यात आले.