पीसीईटीच्या पुणे बिझनेस स्कूलमध्ये ‘ॲग्रीवाईज २०२२’ परिसंवादाचे आयोजन
पिंपरी (प्रतिनिधी) – जागतिक महामारी आणि पर्यावरणीय बदलामुळे दुष्काळ, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे कृषी क्षेत्र प्रचंड अडचणीत आले आहे. याबाबत जनजागृती व्हावी आणि तज्ञ व्यक्तींकडून विद्यार्थी व नागरिकांना योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) निगडी येथील पुणे बिझनेस स्कूल मध्ये ॲग्रीवाईज २०२२ (AgriWise 2022) या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवारी (दि. ३१ मार्च) सकाळी १० वाजता या परिसंवादाचे उद्घाटन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड, कृषी व अर्थतज्ञ डॉ. परशूराम पाटील, सह्याद्री फार्मचे आबासाहेब काळे, ॲग्रोस्टार सितांशु शेठ, दिपक फर्टिलायझरचे विनीत सिंग, जॉन डिअर कंपनीच्या अभिजित परळीकर, सिजेंटा कंपनीच्या दिपाली रजनी, धानुका ऍग्री टेकचे घनश्याम इंगळे, देवयानी पवार, कॉर्पोरेट ट्रेनर तुप्ती जाधव आणि पुणे बिझनेस स्कुलच्या डीन डॉ. मंजू पुनिया चोप्रा आदी मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
या परिसंवादामध्ये जागतिक महामारी नंतर कृषी क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी. सरकारी पातळीवर कृषी व्यवसायासाठी होत असलेले धोरणात्मक निर्णय, कृषी क्षेत्राच्या कॉर्पोरेट मधील संधी, स्टार्ट अप कसे सुरु करावे, कृषी उद्योजकता वाढविण्यासाठी मार्गदर्शन व चर्चासत्र होणार आहे. कृषी क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी आणि कृषी क्षेत्रातील संबंधित नागरिकांसाठी या विनामूल्य परिसंवादात उपस्थित रहावे असे आवाहन पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी केले आहे.