अरविंद केजरीवाल यांच्यावरील जीवघेणा हल्ला म्हणजे विचारांच्या लढाईत भाजपाने पत्करलेला पराभव
- ‘आप’चे शहर कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी केला भाजपाचा निषेध
पिंपरी (प्रतिनिधी) – पोलिसांच्या संगनमताने भाजपच्या गुंडांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानी सुरक्षा कवच तोडून, सीसीटीव्ही व इतर संसाधनांची नासधूस केली. त्यांच्या जीवितास घातपात करण्याचा प्रयत्न केला, याचा आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवडच्या वतीने निषेध केला आहे.
भाजप केजरीवाल यांना पराभूत करू शकत नाही, म्हणून ते त्यांना मारण्याचा प्रयत्न करत आहेत. आजची घटना म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या हत्येचा भाजपचा पूर्वनियोजित डाव होता. पंजाबमध्ये आपचा विजय आणि भाजपचा पराभव झाला. यामुळे भाजपला अरविंद केजरीवाल यांची हत्या करायची आहे. त्यांचे कृत्य म्हणजे भाजपाने विचारांच्या लढाईत पराभव पत्करल्याचे लक्षण आहे. त्यामुळे भाजपाचा जाहीर निषेध करतो, अशी प्रतिक्रिया आपचे पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी दिली आहे.