काटे वस्ती कॉलनीत 23 अनधिकृत नळ कनेक्शनवर कारवाई तर 18 मोटारी जप्त
पिंपरी (प्रतिनिधी) – प्रभाग क्रमांक ३ मधील काटे वस्ती कॉलनी क्रमांक ४ येथे महापालिकेमार्फत एकूण २३ अनधिकृत नळजोड बंद केले आणि मनपाचे थेट नळाला लावलेल्या एकूण १८ विद्युत मोटर्स जप्त केल्या आहेत.
ही कारवाई १ उपअभियंता, १ कनिष्ठ अभियंता, १ मीटर निरिक्षक, ४ राज्य राखीव सुरक्षा बल यांचे कर्मचारी, २ मनपाचे फिटर, ६ मजूर, २ वायरमन, अतिक्रमण गाडी चालकासह १ अशा एकूण १८ जणांच्या पथकाने केली.
कारवाई इ प्रभागाचे उपअभियंता सुदर्शन वहीकर, कनिष्ठ अभियंता विनय जगताप, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामनाथ टकले यांचे मार्गदर्शनाखाली करणेत आली.