भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी कमलेश बाहरवाल यांची नियुक्ती

पिंपरी (प्रतिनिधी) –  भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी कमलेश बाहरवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी  महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष मा. उमाताई खापरे यांच्याकडून  कमलेश बाहरवाल यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या प्रसंगी भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेशदादा लांडगे, प्रदेश सचिव अमित गोरखे, माजी महापौर नितीन काळजे, माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे,  राजेश पिल्ले,  चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप,  युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात, विजय फुगे, अॅड. मोरेश्वर शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टीतील त्यांच्या संघटनात्मक कार्याची दखल घेऊन त्यांची ही नियुक्ती करण्यात आली. यापुढील वाटचालीत भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक बांधणी अधिक भक्कमपणे करण्यासाठी, तसेच महिला आघाडीच्या माध्यमातून तळागाळातील महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे, त्याकरिता नियोजनबध्द कार्यक्रम आखणी करण्याच जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

Share to