पिंपरी डेअरी फार्म उड्डाणपुलाची निविदा प्रसिद्ध, लवकरच उड्डाणपुलाचे काम सुरू होणार

पिंपरी- पिंपरीगावातील मिलिटरी डेअरी फार्म रेल्वे फाटकाजवळ नव्याने विकसीत होणाऱ्या उड्डाणपूलाची निविदा आज, शनिवार दिनांक १६ जुलै २०२२ रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये रेल्वे ओवर ब्रिज, डिझाईन, कंस्ट्रक्शन तसेच जोडलेल्या रस्त्याचा सरासरी खर्च ५७, ५७,३०,५७७ रुपये आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक, तसेच पिंपरी कॅम्प आणि पिंपरी वाघेरे गावासाठी डेअरी फार्म उड्डाणपूल होण्याबाबत आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब, संरक्षण मंत्री मा. राजनाथ सिंह साहेब, मा.अजितदादा पवार यांनी वेळोवेळी रेल्वे विभाग व संरक्षण विभागा समवेत मिटिंग करून मार्गदर्शन केल्याबद्दल विशेष आभार.

तसेच, मा. महापौर श्री. संजोग भिकु वाघेरे-पाटील यांनी अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. नगरसेविका सौ.उषाताई संजोग वाघेरे-पाटील, नगरसेवक श्री. डब्बू असवाणी यांनी सातत्याने प्रयत्न केले. या उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागावा याकरिता तत्कालीन‌ नगरसेवक आणि पदाधिकारी रंगनाथ कुदळे, हरेश आसवानी, हनुमंत नेवाळे, दत्ता वाघेरे, प्रभाकर वाघेरे, माधुरी मुलचंदाणी, सुनिता वाघेरे, गिरिजा कुदळे या सर्वांनी देखील वेळोवेळी प्रयत्न केले. सर्वांच्या प्रयत्नांना यश आले असून महानगरपालिकेच्या माध्यमातून डेअरी फार्म उड्डाण पुलाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता लवकरच प्रत्यक्ष कामास सुरूवात होईल.

Share to