मनसे आगामी महापालिका निवडणुकीच्या सर्व जागा लढवणार – सचिन चिखले

पिंपरी – आगामी निवडणुकीसाठी शहरातील ओबीसी बांधवांना आज ख-या अर्थाने न्याय मिळाला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 साठीची आरक्षण सोडत काढण्यात पालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने अत्यंत आनंदी वातावरणात कामकाज पार पडले. त्याबद्दल ओबीसी बांधव आणि महापालिका अधिकारी व कर्मचारी यांचे मनसेच्या वतीने अभिनंदन तसेच ओबीसी बांधवांना खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दात मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ओबीसी आरक्षणासह आगामी निवडणुका घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुरूवातीपासूनच आग्रही होती.. आहे… आणि राहणार. आज आरक्षण जाहीर झाल्यामुळे पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदार संघातील ओबीसी बांधवांना देखील आपल्यासोबत निवडणूक लढवण्याचा स्वतंत्र हक्क मिळाल्याचा आनंद आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणा-या पालिका निवडणुकीत आरक्षीत सर्वच जागांवर उमेदवार देणार आहे. त्यामुळे आपल्याला ताकदीने निवडणूक लढवायची आहे. त्यासाठी पालिकेच्या एकूण 46 प्रभागांमध्ये मनसे ताकदीचे उमेदवार उभे करणार आहे. तरी, पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी येणा-या काळात जोमाने कामाला लागायचे आहे, असे आवाहनही चिखले यांनी केले आहे.

Share to