महापालिकेच्या वतीने टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

पिंपरी – लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उप आयुक्त रविकिरण घोडके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे, अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संजय ससाणे, पदाधिकारी नितीन घोलप, दशरथ सकट, संदीप जाधव, दत्तू चव्हाण, कर्मचारी महासंघाचे अभिमान भोसले, मनोज माछरे, नितीन समगीर, उमेश बांदल उपस्थित होते.

निगडी येथील माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी माजी महापौर संजोग वाघेरे, माई ढोरे, उप आयुक्त रविकिरण घोडके, माजी नगरसदस्य अजित गव्हाणे, सचिन चिखले, शशिकिरण गवळी, माजी नगरसदस्या सुमन पवळे, देवेंद्र मोरे आदी उपस्थित होते.

निगडी येथील भक्ती शक्ती चौकातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी माजी महापौर संजोग वाघेरे, माई ढोरे, बहुजन रयत परिषदेचे अध्यक्ष रमेश तात्या गालफाडे, सुरेश पाटू, बबन गायकवाड, बबन नेटके, माजी नगरसदस्य अजित गव्हाणे, सचिन चिखले, शशिकिरण गवळी, बार्टी संस्थेच्या प्रकल्प अधिकारी शितल बंडगर, माजी नगरसदस्या सुमन पवळे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संजय ससाणे, मार्गदर्शक भाऊसाहेब अडागळे, पदाधिकारी दशरथ सकट, मयूर जाधव, संदीप जाधव, नितीन घोलप, यादव खिलारे, मनोज तोरडमल, सुनिल भिसे, नाना कसबे, सतीश भवाळ, अनिल सौदंडे, गणेश साठे, सविता आव्हाड, ज्योती वैरागर, मीना खिलारे, कविता सकट, मीना कांबळे, शिवजयंती उत्सव समितीचे जीवन बोराडे, सागर तापकीर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार संजय ससाणे यांनी मानले.

Share to