स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : भाजपातर्फे शहरभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

  • 7 ते 14 ऑगस्ट रोजी होणार कार्यक्रम

पिंपरी भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याबाबत नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. या मध्ये 7 ते 14 ऑगस्ट दरम्यान आयोजित कार्यक्रमाबाबत चर्चा व नियोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश प्रसिद्धिप्रमुख सुजाता पालांडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार उमा खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पालांडे यांनी दिली.

पालांडे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, आठवडाभर कार्यक्रम होणार आहेत. या मध्ये 7 ऑगस्ट रोजी हॅण्डलुम डे साजरा करण्यात येणार आहे. 11 ऑगस्ट रोजी बहीण भावांचा पवित्र सण रक्षाबंधन साजरा केला जाणार आहे. या बरोबरच 13 किंवा 14 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी “वंदे मातरम् रॅली” चे आयोजन करण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये “रघुपती राघव राजाराम” भजन व “वंदे मातरम्” संपूर्ण गीत लावून प्रत्येक मंडळात, शहरात रॅली काढण्यात येणार आहे.

भाजपाच्या केंद्रीय वरिष्ठ नेत्यांनी प्रत्येक बूथ वर हर घर तिरंगा कार्यक्रम आयोजित करावा, असे आवाहन केले आहे. त्यानुसार प्रत्येक बुथवर हा उपक्रम आयोजित केला जाणार आहे.

अनेक गावात, तालुक्यात, जिल्ह्यात महिला ‘फ्रीडम फायटर’ होऊन गेल्यात आहेत. त्या ठिकाणी जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेण्यात येणार आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या बरोबरच सप्टेंबर मध्ये पोषण आहार अभियानाचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती प्रसिद्धीप्रमुख सुजाता पालांडे यांनी दिली.

Share to