राष्ट्रवादी युवती अध्यक्षा वर्षा जगताप यांच्या वतीने अनोखी रक्षाबंधन साजरी
पिंपरी – महाराष्ट्रात उत्साहात साजरा होणारा श्रावण महिन्यातील पवित्र असा सण म्हणजे भावा बहिनीचे अतूट नातं असलेला रक्षाबंधन. राखी हे विश्वासाच प्रतिक आहे. हाच विश्वास मनात ठेवून राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात अनोखा रक्षाबंधन सण साजरा केला.
कोरोणा योध्यांनी व बारा महिने जे स्वताच्या जीवाची पर्वा न करता ज्यांनी जनसामान्यांसाठी योगदान दिले अशा रुग्णवाहिका चालकांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्षा वर्षा जगताप यांच्या वतीने ही अनोखी रक्षाबंधन साजरी करण्यात आली.
यात सुहास पलांडे, नवनाथ वाडेकर, विजय शेलके, रामचंद्र जगताप, गणेश कामते, सचिन सुतार, नंदकुमार शिखरे, नरेंद्र पाटिल, राहुल माटेकर आदी चालकांना राखी बांधण्यात आली. शलाका बनकर, मेहेक इनामदार, शुभदा पवार, भव्यशीला गायकवाड़, मेघना जगताप, वैभवी गावड़े, वैष्णवी जगताप या युवतींनी सहभाग घेतला.