महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक संघांना टिव्ही वाटप

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत महिला बालके, दिव्यांग व्यक्तीं, मागासवर्गीय व्यक्ती, ज्येष्ठ नागरीक यांचे साठी इतर कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. यामध्ये ज्येष्ठ नागरीक संघटना दरवर्षी समाज विकास विभागामार्फत भेट वस्तु देण्यात येतात. या शहरातील ज्येष्ठ नागरीक संघाना टीव्ही देण्यात यावा, अशी ज्येष्ठ महासंघाची मागणी होती.

त्यानुसार ११६ ज्येष्ठ नागरीक संघाना आज दि.२५/०८/२०२२ रोजी मंगलसेना विरुगंळा केंद्रात टी.व्ही वाटप करण्याच्या कार्यक्रमाला उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, समाज विकास अधिकारी, सुहास बहाद्दरपुरे, पिंपरी चिंचवड महासंघाचे अध्यक्ष अरुण बागडे, महासंघाचे कार्यअध्यक्ष वृषाली मरळ, उपाध्यक्ष बी. आर. माडगुळकर तसेच मोठ्या संख्याने ज्येष्ठ नागरीक उपस्थित होते.

यामधे ज्येष्ठ नागरिक संघ बिजली नगर, ज्येष्ठ नागरिक संघ पिंपरी गाव, आदर्श ज्येष्ठ नागरिक संघ, भोसरी दिघी रोड, ज्येष्ठ नागरिक संघ इंद्रायणी नगर, ज्येष्ठ नागरिक संघ उत्तर नेहरू नगर, यमुना नगर ज्येष्ठ नागरिक संघ, महात्मा ज्योतिराव फुले ज्येष्ठ नागरिक संघ शाहूनगर, ज्येष्ठ नागरिक संघ मोरवाडी आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Share to