स्वमग्न दिव्यांगांना एमआर किटचे वितरण
पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) – जागतिक (ऑटीझम) स्वमग्न जागृती दिनानिमित्त पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत वाकड येथील अभिसार फाउंडेशन या दिव्यांगांसाठीच्या विशेष शाळेतील स्वमग्न विद्यार्थ्यांना एमएसआयईडी संच वितरण करण्यात आले.
या संचामुळं स्वमग्न दिव्यांगांच्या शरीरातील रक्तपुरवठ्याला मदत,बोटांची हालचाल योग्य पद्धतीने करणे,हात व डोळ्याचे नियंत्रण साधता येण्याबरोबरच शारीरिक हालचालीसाठी मोठी मदत होणार आहे तसेच संवेदना वाढून पेशी बळकट होतील आणि शारीरिक समतोल राखण्यासही मोलाची मदत होणार आहे.
यावेळी पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक अशोक सोळंके, समुपदेशक हरिदास शिंदे, सहाय्यक ईश्वर चाळक,डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ सायकोथेरपीच्या डॉ. विधी शहा, अभिसार फाउंडेशनचे सचिव रमेश मुसुडगे, संचालिका कल्पना मोहिते, शाळा समिती सचिव प्राची पुराणिक याचेसह विद्यार्थी, शिक्षक, सेवक, पालक उपस्थित होते.
कार्यक्रमात संस्थेतील विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये तीन पायांची शर्यत, बादलीत बॉल टाकणे, संगीत खुर्ची व नृत्याचा समावेश होता.