राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ‘डेंग्यू’
– डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
सांगली ! प्रतिनिधी
खा. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना डेंग्यू झाला असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पाटील यांना ताप आल्यानंतर डेंग्यूची तपासणी केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. जयंत पाटील यांनीच सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.
गेल्या दोन आठवड्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यु झाल्याचे समोर आले होते. आता नुकतेच जयंत पाटील यांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ताप आल्यानंतर पाटील यांनी डेंग्यूची तपासणी केली. त्यांचा आजच बुधवारी (दि. 15) तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये डेंग्यूचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉक्टरांच्या निगराणी खाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. थोडे दिवस विश्रांतीचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. त्यानंतर पुन्हा कार्यरत राहू, अशी माहिती पाटील यांनी सोशल मीडियावर दिली आहे.
———————————
प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्यूज
– मो. नं – 7350266967