‘पीएमपीएमएल’ बसचा निगडी ते लोणावळा नवीन बसमार्ग आजपासून सुरू
पिंपरी | महाईन्यूज
निगडी ते लोणावळा या नवीन बसमार्गाचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, मनसे गटनेते सचिन चिखले, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, नगरसेविका सुमन पवळे, नगरसेविका पुणे ज्योस्ना एकबोटे, चिएफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) पीएमपीएमएल दत्तात्रय झेंडे, आगार व्यवस्थापक संत तुकारामनगर संतोष माने आदी उपस्थित होते.