चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनी मानवंदना, संचलन, सांस्कृतिक कार्यक्रमाने बहार

पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२४) :- पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये ७८ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाळेमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शालेय विद्यार्थ्यांनी मानवंदना, संचलन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. देशभक्तीपर गाणी, नृत्य, नाटक, तसेच भाषणे सादर करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहूणे प्रोफेसर डॉ. पोपटराव येवले यांनी ध्वजारोहण केले. त्यांच्या भाषणाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली. कार्यक्रमाला चॅलेंजर पब्लिक स्कूलचे चेअरमन संदीप काटे तसेच निलेश काटे, लीना काटे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
डॉ कविता शिंदे, प्रतिभा पाटील, हेरंभ ठसे, गुरुप्रसाद मोहोळकर आदि पालकांच्या भाषणाने शाळेचे वातावरण देशभक्तीमय झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका प्रिती तळेकर आणि विद्यार्थिनी समीक्षा मिश्रा यांनी केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुविधा महाले यांच्या प्रोत्साहनपर भाषणाने उपस्थित शिक्षक सहकारी आणि विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला. स्वातंत्र्यदिन सोहळा अविस्मरणीय होण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षक सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.