खेळाडुंनी क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल कामगिरी बजवावी – महापौर माई ढोरे
पिंपरी (प्रतिनिधी) – क्रिडा क्षेत्रात नैपुण्य मिळवुन खेळाडुंनी शहराचे नावलौकीकात भर घातली असून त्याची नवोदित खेळाडुंनी त्यापासुन प्रेरणा घेवून क्रिडा क्षेत्रात उज्वल कामगिरी बजवावी असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सन २०१९ – २० या वर्षात झालेलया राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विविध क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविणा-या खेळाडूंचा सत्कार समारंभ आज पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदीरात महापौर माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, नगरसदस्य प्रा.उत्तम केंदळे, नगरसदस्या अपर्णा डोके, स्विकृत नगरसदस्य माऊली थोरात, सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सन २०१९-२० अनुषंगाने झालेल्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विविध क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळालेल्या सत्कारार्थी खेळाडूंची नावे खालील प्रमाणे…




