चंद्रकांत पाटील यांच्यावर पक्षनेतृत्वाची नाराजी, नेत्यांमधील समन्वय वाढविण्याच्या दिल्या सूचना
मुंबई – भाजपाचे देशाचे नेते अमित शाहा यांनी प्रदेश पातळीवरील पक्षाच्या कामांवर नराजी व्यक्त केल्याचं समजतय. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पक्षवाढीसंदर्भात सूचना दिल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ कोल्हापूर आणि पुण्यापुरते मर्यादीत न राहता राज्यभरात दौरे सुरू करा. कार्यपध्दतीत सुधारणा करा, नेत्यांमधील समन्वय वाढवा, असे शाहा यांनी पाटील यांना स्पष्टपणे सांगितल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शुक्रवारी दिल्लीच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजपचे महासचिव बी. एल. संतोष यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत पक्ष नेतृत्त्वानं पाटील यांना सुनावल्याचं समजतं. कार्यपद्धतीत सुधारणा करण्याच्या सूचना पाटील यांना देण्यात आल्या आहेत.
मोदी सरकारने कित्येक योजना सुरू केल्या आहेत. त्या जनतेपर्यंत पोहोचवण्यात भाजप कमी पडत आहे. राज्यातील भाजप नेत्यांमध्ये समन्वयचा अभाव आहे. महाविकास आघाडी सरकारला घेरण्यात भाजप कमी पडत आहे. नवाब मलिक प्रकरणात पक्ष कमी पडला. केवळ कोल्हापूर, पुण्यात फिरू नका, राज्यभर दौरे करा. नेते, कार्यकर्त्यांशी संवाद साधा, अशा सूचना पाटील यांना करण्यात आल्या आहेत.
चंद्रकांत पाटील राज्य भाजपचं नेतृत्व एक टीम म्हणून करण्यात कमी पडत असल्याचं नेतृत्वाला वाटतं. त्यामुळेच नेते, कार्यकर्त्यांशी संवाद वाढवा. बऱ्याचदा समन्वय दिसत नाही. त्यावर काम करा. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी कामाला लागा, असे आदेश दिल्ली दौऱ्यात पाटील यांना देण्यात आले.