ऐतवडे बुद्रुकच्या भीम जयंतीने घातला आदर्श
– आचारसंहितेच्या नियमांचे पालन करत मिरवणूक उत्साहात साजरी’
सांगली ! प्रदीप लोखंडे
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. याचे तंतोतंत पालन करत ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा, जि. सांगली) येथील भीम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. उत्सवाला कोणतेही गालबोट न लागता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यशस्वी नियोजन केले. पोलीस प्रशासनाकडून दिलेल्या वेळेच्या आत मिरवणूक कार्यक्रमाचा समारोप करून आदर्श घातला आहे.

पंचक्रोशीतील मोठी आणि शिस्तबद्ध जयंती म्हणून ऐतवडे बुद्रुक येथील भीम जयंतीचा नावलौकिक आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात जयंती कार्यक्रम पार पडला जातो. यंदाच्या वर्षीही मिरवणुकीत शेकडो भीम अनुयायी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. ११ किंवा १३ एप्रिल रोजी महिलांनी पाककला, संगीत खुर्ची, विज्ञान प्रदर्शन, वक्तृत्व स्पर्धा आधीसह विविध स्पर्धांचे मोठ्या उत्साहात आयोजन केले होते. 14 एप्रिल रोजी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कार्यक्रम पार पडला. समता सैनिक दलाच्या वतीने सलामी देण्यात आली. विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर बाबासाहेबांच्या पुतळा परिसरातून बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली. गावातील प्रमुख रस्त्यांवरून ही बाईक रॅली आयोजित करण्यात आली. दुपारी १२ वाजल्यानंतर भोजनाचा कार्यक्रम पडला. सायंकाळी वाद्यांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. यानिमित्त सायंकाळी दहा वाजण्याच्या आत मिरवणूक उत्सव कार्यक्रमाचा समारोप करण्याची सूचना पोलीस प्रशासनाने घालून दिली होती. याचे तंतोतंत पालन करून दिलेल्या वेळेत कार्यक्रमाचा भीम अनुयायांनी समारोप केला.
—————————————————-
– प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्यूज
– मो. नं : ७३५०२६६९६७
–