“मला अटक झालीय, पण… मी लढणार आणि जिंकणार ही”; अटकेनंतर नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) अटक केली आहे. जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून चौकशी केल्यानंतर ईडीने ही अटकेची कारवाई केलीय. अटकेनंतर नवाब मलिक यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय.
प्राप्त माहितीनुसार पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिक यांच्या घरी धडकलं होतं. त्यानंतर सकाळी सात वाजल्यापासून नवाब मलिक यांची मुंबईतील ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू होती. दुपारी तीनच्या सुमारास मलिक यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.
अटकेच्या कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया देताना नवाब मलिक यांनी, “मला अटक झालीय, पण मी घाबरणार नाही. मी लढणार आणि जिंकणार,” अशी प्रतिक्रिया दिलीय.