शासकीय नोकरदारांनी जोपासली सामाजिक बांधिलकी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ऐतवडे बुद्रुक जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सांगली : प्रदीप लोखंडे
महाराष्ट्र पोलिस प्रशासनात सेवा बजाविणाऱ्या ऐतवडे बुद्रुक येथील नोकरदारांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रवीण लोखंडे, अमोल कांबळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी सुहानंद कांबळे यांनी सामाजिक भान ठेऊन हा उपक्रम राबविला.
या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता कदम, प्रतिभा कांबळे यांच्यासह त्यांचे सहकारी, सचिन वाघमारे, सुहानंद कांबळे, सुरज कांबळे, अभिनय कांबळे, हर्षद कांबळे, प्रशांत कांबळे, प्रदीप लोखंडे आदीसह मित्रपरिवार, विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला महत्व दिले आहे. शिकलेला समाज सामाजिक प्रगतीला पुढे घेऊन जात असतो. बाबासाहेबांचे हे विचार जोपासून प्रवीण लोखंडे, अमोल कांबळे हे विविध सामाजिक उपक्रम स्व:खर्चातून राबवित आहेत. याचाच एक भाग म्हणून ऐतवडे बुद्रुक येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींची शाळा येथे मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये वही, कंपास बॉक्सचा सेट देण्यात आला. सर्व सामान्य कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीतून आर्थिक हातभार लावावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला अशी माहिती प्रवीण लोखंडे, अमोल कांबळे यांनी दिली.
—————————–
– प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्युज
– मो. नं : 7350266967