ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती
- महाराष्ट्र कॉंग्रेस सचिव सचिन साठे यांनी केले अभिनंदन
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष तसेच कायदा सेल विभागाचे अध्यक्ष ॲड. अनिरुध्द कांबळे आणि पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष तसेच कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप पांढारकर यांची पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष पदावर कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे संघटन व प्रशासन सरचिटणीस देवानंद पवार यांनी शनिवारी (दि. 11 डिसेंबर) ॲड. कांबळे व पांढारकर यांना नियुक्तीचे पत्र दिले.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे यांनी ॲड. कांबळे व पांढारकर यांचे सोमवारी (दि. 13 डिसेंबर) पिंपळे निलख येथील कार्यक्रमात शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, बाळासाहेब साळुंके, परशुराम गुंजाळ, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, ज्येष्ठ नेते संदेश नवले, राजाभाऊ काळभोर, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस मयुर जयस्वाल, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, सेवा दलाचे माजी शहराध्यक्ष मकरध्वज यादव, चिंचवड विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष संदेश बोर्डे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सोशल मिडीया समन्वयक चंद्रशेखर जाधव, गौरव चौधरी, प्रतिक्षा कांबळे, कुंदन कसबे, वसिम शेख, पांडूरंग जगताप, गुंगा क्षिरसागर, आण्णा कसबे, हर्षवर्धन पांढारकर आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या बरोबरच या दोन नवनियुक्त शहर कार्याध्यक्षांवर महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ॲड. कांबळे व पांढारकर हे शहर कॉग्रेसच्या सर्व कार्यक्रमात विविध आंदोलनात नेहमीच सक्रिय असतात. यामुळेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ॲड. कांबळे व पांढारकर यांची नियुक्ती केली आहे.