‘एमपीएससी’ परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांची आत्महत्या

पुणे (प्रतिनिधी) – राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या पुण्यातील एका विद्यार्थ्याने राहत्या घरी आत्महत्या केली. दौंड तालुक्यात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.

मल्हारी नामदेव बारवकर (वय 25) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मल्हारी हा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत होता. यापुर्वी त्याने तीन ते चार वेळा ही परीक्षा दिली होती. येत्या 2 जानेवारीला त्याची पूर्व परीक्षा होणार होती. परंतु सतत परीक्षा पुढे ढकलत असल्यामुळे तो निराश झाला होता.

मल्हारीच्या वडिलांनी जमीन विकून मल्हारीच्या शिक्षणासाठी पैसे उभे केले होते. मात्र आज सायंकाळच्या सुमारास यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात मल्हारी बारवकर यांचे चुलते महादेव पांडुरंग बारवकर यांनी तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक नारायण पवार करीत आहेत

Share to