रहाटणीत पतीच्या त्रासाला कंटाळून मायलेकीची आत्महत्या

पिंपरी (प्रतिनिधी) – पतीच्या त्रासाला कंटाळून मायलेकीने आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार रहाटणीतील सज्जनगर कॉलनीत आज सकाळी आकराच्या सुमारास उघडकीस आला आहे.

सोनाली युवराज नवले (वय 30) आणि श्रावणी युवराज नवले (वय 12) असे आत्महत्या केलेल्या मायलेकीची नावं आहेत. पतीच्या त्रासाला कंटाळून मायलेकीने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे. अशी माहिती वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिली.

अकस्मात मयत म्हणून तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास प्रक्रियेसाठी व्हिसेरा राखून ठेवला आहे. मायलेकीचे शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. विच्छेदन अहवाल आणि माहेरच्या लोकांचे आरोप विचारात घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल,’ असे विवेक मुगळीकर म्हणाले.

दरम्यान, मुलीच्या माहेरच्या लोकांना घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पोलिसांना शव ताब्यात घेण्यासाठी सुरवातीला अडवणूक करण्यात आली. पोलिसांनी त्यानंतर दंगा नियंत्रक पथक बोलवली गर्दी नियंत्रणात आणून शव ताब्यात घेतले. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

Share to