सांगवीतील काटेपुरम चौकात गुन्हेगारांचा बेछूट गोळीबार, गोळी लागून एकाचा मृत्यू

पिंपरी (प्रतिनिधी) – सांगवीतील काटेपुरम चौकात दिवसाढवळ्या एका तरुणावर बंदुकीतून गोळ्या झाडण्यात आल्या. आज सकाळी हा प्रकार घडला असून यात योगेश जगताप याचा गोळी लागून मृत्यू झाला आहे.

यानंतर घटनास्थळी मोठा बंदोबस्त करण्यात आला असून दंगल नियंत्रण पथक, सीआरपीएफचे पथक दाखल झाले आहे. परिसरात भीतीचे वातावरण असून दत्त जयंती निमित्त होणारे कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहे. तसेच पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी देखील घटनास्थळी भेट दिली आहे.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये दोन आरोपी योगेश यांच्यावर गोळीबार करताना दिसत आहेत. गणेश मोटे असे एका संशयित आरोपीचे नाव असल्याची माहिती मिळतेय. मयत योगेश जगताप आणि संशयित आरोपी दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. जगताप याला यापूर्वी तडीपार करण्यात आले होते. तो लोकांना व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करायचा अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Share to