सप्तर्षी फाउंडेशन व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीच्या वतीने दिव्यांग मुलांसाठी मोफत होमिओपॅथी शिबिर
पिंपरी (प्रतिनिधी) – रहाटणी येथील सप्तर्षी फाउंडेशन व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी यांच्या वतीने दिव्यांग मुलांसाठी मोफत होमिओपॅथी तपासणी शिबीर घेण्यात आले. शेकडो दिव्यांग व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घेतला.
वाकड येथील लक्ष्मीबाई बारणे उद्यानात हे मोफत हॉमिओपॅथी तपासणी शिबीर घेण्यात आले. यावेळी या शिबिराचे उद्घाटन महिला व बालकल्याण समिती सभापती सविता खुळे, पोलीस निरीक्षक संतोष पाटील, स्वी. सदस्य गोपाळ माळेकर, सांगवी जिल्हा रुग्णालयातील मनोचिकित्सा विभागाचे मिलिंद करंजकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, सहाय्यक पोलीस आयुक्त दिसले, नगरसेवक नाना काटे, बापू काटे, बाबा त्रिभुवन, मयूर कलाटे, अभिषेक बारणे, कैलास बारणे, अण्णा नखाते, उन्नती फाउंडेशनचे संजय भिसे, स्वी. सदस्य संदीप नखाते, चॅलेंजर पब्लिक स्कूलचे संस्थापक संदीप काटे यांचे कार्यक्रमाला सहकार्य लाभले.
दिव्यांग मुलांचा संभाळ करण्यामध्ये पालकांचा वेळ, ऊर्जा, पैसा व काही प्रमाणात आशा संपुष्टात आलेली असते, अशा पालकांसाठी सप्तर्षी फाउंडेशन व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी यांनी आशेचा किरण निर्माण केला आहे. ऑगस्ट २०२१ पासून सुरू केलेल्या या प्रयत्नाअंतर्गत शेकडो दिव्यांगांच्या कुटुंबांना आधार सप्तर्षी फाउंडेशनच्या माध्यमातून मिळाला आहे. या उपक्रमाअंतर्गत नोंदणी झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत कायमस्वरूपी उपचार दिले जातात. नोंदणी झाल्याशिवाय शिबिरास प्रवेश दिला जात नसल्याने गर्दी टाळूनही शेकडो लाभार्थी लाभ घेत आहेत.
या शिबिरात विशेष (दिव्यांग) मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. मोफत औषधे देण्यात आली. शिबिरामध्ये शंभर पेक्षा अधीक लाभार्थ्यांनी लाभ घेतला. शिबिर कै. डॉ. प्रफुल्ल विजयकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केले जाते. कै. डॉ. प्रफुल्ल विजयकर यांनी 2005 साली सेवा भावातून विशेष मुलांसाठी महाबळेश्वर येथे चारिटेबल होमिओपॅथिक कॅम्पची सुरुवात केली. आजपर्यंत विजयकर यांच्यामुळे हजारो विशेष मुलांना निस्वार्थ भावनेतून शास्त्रशुद्ध होमिओपॅथी उपचार घेता आले आहेत. या शिबिरात लाभ घेतलेल्या दिव्यांग मुलांच्या पालकांनी अभिप्राय दिले आहेत.