चिखलीतील 18 मीटर ‘डीपी’ रस्त्याचे महापौरांच्या हस्ते भूमीपूजन
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्र.१ चिखली मधील धर्मराजनगर कडे जाणारा १८. मी. रुंद डी.पी.रस्ता विकसित करण्यात येत आहे. त्याचे भूमीपूजन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
या कार्यक्रमास आमदार महेश लांडगे, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, प्रभाग अध्यक्ष कुंदन गायकवाड, विधी समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, नगरसेविका साधना मळेकर, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे आदी उपस्थित होते.