शरद पवार यांच्या मेट्रो पाहणी दौ-यामुळे महापौरांना पोटशूळ, त्यांच्या बुध्दीची किव येते

  • नगरसेविका माया संतोष बारणे यांनी महापौरांच्या टिकेला दिले प्रत्युत्तर

पिंपरी (प्रतिनिधी) – राज्यातील महाविकास आघाडीचे प्रणेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे महामेट्रोच्या कामाची ट्रायल रन घेऊन पाहणी केली. त्याचा पोटशूळ झाल्याने महापौरांनी घाईघाईत पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर टिका केली. महापालिकेतील सत्तेचे सिंहासन गडबडू लागल्याने महापौरांची पळापळ सुरू झाली आहे. शरद पवार यांच्यावर टिका करताना महापौरांच्या बुध्दीची किव येते, अशा शब्दांत नगरसेविका माया संतोष बारणे यांनी टिकेला प्रत्युत्तर दिले आहे.

पुणे मेट्रोचा पाहणी दौरा करण्यासाठी नेते शरद पवार काल शहरात आले होते. त्यांनी मेट्रोचा ट्रायल रन घेऊन पिंपरी-चिंचवडकरांच्या सुरक्षित प्रवासाचा आढावा घेतला. मेट्रोचा प्रकल्प मोठ्या रक्कमेचा असून दुय्यम दर्जाचे काम होता कामाने नये, अशा सूचनाही त्यांनी मेट्रो प्रशासनाला दिल्या. पवार यांनी स्वतः दखल घेवून पाहणी केल्यामुळे भाजपाच्या लोकांना पोटशूळ झाला आहे. पवार यांच्या दौ-यांमुळे त्यांना सळो की पळो झाले आहे, अशी टिका नगरसेविका बारणे यांनी केली आहे.

गेल्या ५ जानेवारी रोजी शहराती विविध विकासकामांची उद्घाटने चंद्रकांत पाटील यांच्या  हस्ते का गेण्यात आली ? त्यांचा काय संबध ते या शहरातील आमदार आहेत का ? ते महाराष्ट्राचे मंत्री आहेत का ? असे प्रश्न देखील नगरसेविका बारणे यांनी उपस्थित केले.

माझ्या प्रभागातील उद्घाटन घेण्यात येणार असल्याची माहिती मला एक दिवस आधी कळते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण देण्यासाठी पाठपुरावा सुरू असताना घाई- गडबडीत त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटने घेतली. महापौरांच्या पदाला हे कृत्य अशोभनिय आहे. महामेट्रो ही काय भाजपची मक्तेदारी नाही. शरद पवार हे राज्यसभेचे खासदार आहेत, त्यांच्यावर टिका करताना महापौरांनी भान ठिकाण्यावर ठेवूनच विधान करावे, असेही नगरसेविका बारणे म्हणाल्या.

Share to