१५ ते १८ वयोगटातील युवकांसाठी वाकडमध्ये लसीकरण केंद्र सुरु करा – विशाल वाकडकर

पिंपरी (प्रतिनिधी) – कोरोना महामारीचा संपूर्ण देशात अनेक राज्यांसह शहरातील नागरिकांना सामना करावा लागत आहे. त्यात आता कोरोनाची तिसरी लाट उफाळून आली आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता सरकारने १५ ते १८ वयोगटासाठी लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. ३ जानेवारीपासून याची अंमलबजावणी होत आहे. पण वेगाने लसीकरण होण्यासाठी शहरातील वाकड भागामध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विशाल वाकडकर यांनी केली आहे.यासंदर्भात त्यांनी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, वाकडमधील आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती येथे १५ ते १८ वयोगटातील मुलामुलींसाठी लसीकरण केंद्र सुरु करावे. असे त्यांनी म्हटले आहे. निवेदन देताना शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल काटे, प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, शहर उपाध्यक्ष संतोष वाघेरे पाटील, शहर सरचिटणीस चेतन फेंगसे आणि अक्षय माछरे उपस्थित होते.

Share to