प्रा. दिपाली नलावडे- चिंचवडे यांना ‘विद्यावाचस्पती’ पदवी प्रदान

पिंपरी (प्रतिनिधी) – सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातील प्रा. दिपाली नलावडे-चिंचवडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती पदवी प्रदान करण्यात आली.

बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र संशोधन केंद्रांतर्गत प्राचार्य डॉ. शिवाजी ढगे यांच्या संशोधन व मार्गदर्शनाखाली ‘कोकण विभागातील काजू उत्पादन व विपणनाचे अर्थशास्त्रीय अध्ययन’ या विषयावर त्यांनी आपला प्रबंध सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास सादर केला.

प्रा. दिपाली चिंचवडे यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार, सर्व सन्माननीय पदाधिकारी, प्राचार्य, विभाग प्रमुख व सहकाऱ्यांनी अभिनंदन केले असून सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी एका सावित्रीच्या लेकीला शिक्षण क्षेत्रातील उच्च पदवी मिळाल्याबद्दल पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विलास आढाव यांनी अभिनंदन केले. प्रा. दिपाली चिंचवडे या मूळच्या जुन्नर तालुक्यातील बोरी गावाच्या रहिवाशी आहेत. गेली सहा वर्षे त्या घोलप महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

Share to