चिंचवडमध्ये तिरंगा रॅलीद्वारे स्वातंत्र्याच्या चळवळीतील आठवणींना उजाळा

पिंपरी – देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. नागरिकांच्या मनात देश प्रेमाची भावना निर्माण होण्यासाठी माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या वतीने क्रांतीवीर चापेकर चौक ते क्रांतीवीर चापेकर नगर, चिंचवडे नगर तिरंगा रॅली काढून त्याद्वारे स्वातंत्र्याच्या चळवळीतील आठवणींना उजाळा दिला. या रॅलीत पारंपारिक वेश परिधान करून शाळकरी मुले- मुली, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक यांनी सहभाग नोंदविला.

तसेच, देश स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले सर्वस्व पणाला लावणा-या आणि स्वातंत्र्य संग्रामात बलिदान देणा-या वीरांचा जाज्वल्य इतिहास पुढ़च्या पिढ़ीला स्मरण राहुन प्रेरित व्हावा, या उददेशाने “क्रांतीविर चापेकर नगर” येथे ३०० पेक्षा अधिक महान क्रांतीकारकांचे चित्रप्रदर्शन व माहितीपटाचे देखील यावेळी करण्यात आले. देश स्वातंत्र्य मिळवून देणा-या महान क्रांतीकारकांचा प्रेरणादायी इतिहास उलगडणा-या या चित्रप्रदर्शनी, माहितीपटाचा उदघाटन सोहळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिं. ‍चिं. जिल्हा कार्यवाहक महेश्वर मराठे यांच्याहस्ते पार पडला. यावेळी, यावेळी प्रमुख पाहुणे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे, आयुक्त राजेश पाटील, श्री. शंकरशेठ जगताप, पदमश्री डॉ. गिरीश प्रभुणे, मुकुंदराव कुलकर्णी, संदीप जाधव, माजी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे, महिला मोर्चाच्या पल्लवी वाल्हेकर, प्रभाग अध्यक्ष भगवान निकम, कामगार आघाडी धिरज धाकड, प्रदीप पटेल, सचिन महाले, नवनाथ वाघमारे, संदीप महाजन, कैलास रोटे, रविंद्र कुवर, प्रल्हाद पाटील, माऊली जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

केंद्र व राज्य शासनाच्या सुचनांनुसार देश स्वातंत्र्याचे ७५ व्या वर्षाचे औचित्य साधून १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत “ हर घर तिरंगा” हा उपक्रम राबविण्यात येत असून माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्यावतीने दि. ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत क्रांतीवीर चापेकर नगर, स्पाईन रोड, चिंचवडे नगर (जुने रावजी गार्डन) याठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये, स्वातंत्र्य सेनानी, गोवा मुक्ती संग्रामातील सेनानी, आणीबाणीतील सत्याग्रही अथवा त्यांचे कुटूंबीय तसेच १९४७ साली स्वातंत्र्य दिवस पाहिलेले नागरिक यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून हेमंतराव हरहरे उपस्थित राहतील. त्याचबरोबर, सर्व वयोगटासाठी देशाच्या स्वातंत्र्यलढयात आपले सर्वस्वी अर्पण करणाऱ्या महान क्रांतीकारक व विरांगणा यांची वेशभुषा स्पर्धा घेण्यात येणार आहे. १८५७ ते १९४७ या काळातील थोर क्रांतीकारक (वयोगट ५वी ते ८वी) आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षी बदलता भारत (वयोगट ९ वी ते १२वी), १९४७ ला स्वातंत्र्याचा शताब्दी वर्षात पदार्पण करतांना भारताची महासत्तेकडे वाटचाली विषयी संकल्पना (खुला वयोगट) या तीन विषयांवर निबंध स्पर्धा, पिंपरी चिंचवड शहराचे ग्रामपंचायत, नगरपालिका ते महापालिका जडण-घडणमध्ये शहराला महत्वपुर्ण योगदान देणारे आजी- माजी सरपंच, नगराध्यक्ष, महापौर व पोलिस पाटील अथवा कुटूंबियांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रकाशराव मीठभाकरे उपस्थित राहतील. तसेच, देश भक्ती वर गितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

क्रांतीवीर चापेकर नगरी येथे देशाच्या महान क्रांतीकारकांचा सोनेरी इतिहासाविषयी चित्र प्रदर्शनास आपल्या मुलांना व कुटूंबासह सकाळी १० ते सायं. ८ या वेळेत भेट देवून शाळा, महाविद्यालये, विरंगुळा केंद्र, पर्यावरण प्रेमी, वृक्षप्रेमी, सोसायटी, सामाजिक व राजकीय संघटनांनी देश स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक श्री. ढाके यांनी केले आहे.

Share to