प्रहार जनशक्ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढणार – अनिल गावंडे

पिंपरी | महाईन्यूज

पुणे जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहरध्यक्ष विनोद जगन्नाथ गायकवाड यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले. अगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्ष पूर्ण ताकदीने लढणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पक्षाची आढावा बैठक शासकीय निवासस्थानी राजगड पुणे येथे घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यमंत्री बच्चु भाऊ कडु यांचे विचार तळागाळातील वंचित घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी आपण प्रहारची पाळेमुळे खोलवर रुजवली पाहीजे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रहार जनशक्ती चाळीस जागा लढवणार आहे. पुणे जिल्हा स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रहारचा प्रवेश निश्चित आहे. दिव्यांग, अनाथ, शेतकरी, विधवा, कामगार मजूर वर्ग यांच्यासाठी राज्यमंत्री बच्चु कडु यांचे कार्य संपुर्ण महाराष्ट्रास ज्ञात आहे. त्यांचे विचार हे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी झटण्याची गरज आहे. प्रहार जनशक्ती पक्षाची सदस्य नोंदणी सुरु असून जास्तीत जास्त सदस्य प्रहारशी जोडण्यात यावे. सामाजिक कार्य करत असताना सत्तेत सहभाग असणं ही आवश्यक आहे. त्यासाठी निवडणूकीत जास्तीतजास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासुनच कामाला लागावे, असे आवाहन गावंडे यांनी केले.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत पोचण्यासाठी जिल्हा कार्याध्यक्ष बापुसाहेब नवले हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. ग्रामीण भागातही प्रहारचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असे गावंडे यांनी सांगितले. यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष ॲड. अनंत काळे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष बापुसाहेब नवले पाटील, पुणे जिल्हा मार्गदर्शक तथा माजी शहरध्यक्ष नंदकिशोर जगदाळे, पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष विनोद गायकवाड, शिरूर तालुका अध्यक्ष ॲड राहुल वाळके, खेड तालुका कार्याध्यक्ष सुनील जाधव, आंबेगाव तालुका अध्यक्ष जितेंद्र भालेराव, इंदापूर भोर तालुका अध्यक्ष संतोष मोहिते, पुरंदर तालुका अध्यक्ष ॲड. महादेव कापरे, दौंड तालुका अध्यक्ष रमेश शितोळे, जुन्नर तालुका अध्यक्ष संतोष कबाडी, कामगार आघाडी, विद्यार्थी आघाडी, शेतकरी, संघटनेचे अनेक पदाधिकारी व महिला आघाडीचे पदाधिकार व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share to