नवरात्रौत्सवात प्राधिकरणामध्ये रंगला ‘महाभोंडला’

  • माजी उपमहापौर शैलजाताई मोरे यांची लाभली उपस्थिती

पिंपरी (प्रतिनिधी) – निगडी प्राधिकरणातील सेक्टर 28 मधील श्री जिव्हेश्वर हौसिंग सोसायटीत रहिवासी महिलांनी नवरात्रौत्सवात नऊ दिवस वेगवेगळ्या गीतांवर दररोज एका कुटुंबियांच्या आंगणात पारंपारिक भोंडला साजरा केला.

या सोसायटी मध्ये गेली 35 वर्षे भोंडला साजरा केला जातो. याला 35 वर्ष पूर्ण झाल्याचे निमित्त साधून कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर सौ. वर्षा विजय शेटे आणि सौ. तेजश्री अष्टेकर यांनी मंगळवारी महाभोंडल्याचे नियोजन केले. सोसायटीतील कुटुंबांना एकत्र जोडणारा हा खेळ व्यापक स्वरूपात साजरा होत आहे. त्यामुळे हे ‘विश्वचि माझे घर’ या उक्तीप्रमाणे एकमेकांचे नाते घट्ट होत आहे. यावेळी तीन पिढ्यांमधील महिलांनी एकत्र येऊन महाभोंडला साजरा केला.

टिप-या, देवाची गाणी, नृत्य, फुगडी आदी खेळ सादर करत वातावरणात चैतन्य निर्माण केले. भोंडल्याची पूजा झाल्यानंतर पारंपारिक पध्दतीने नैवेद्य दाखविण्यात आला. यावेळी नगरसेवक तथा पिंपरी-चिंचवडच्या माजी उपमहापौर शैलजाताई मोरे यांची उपस्थिती प्रार्थनिय होती. यावेळी आशा शेटे, सुषमा अष्टेकर, कलावती साळी, पल्लवी अंजिखाने, शितल शिंपी, गीता ठोके, स्वाती तवले, रजनी मारवाडी, सुनंदा दुर्गूळे, वैशाली शिंपी, सविता गुरमाळे, अश्विनी यादव, छाया नवले, विवा शेटे, सई शिंपी, श्रावणी ठोके, प्राजक्ता ठोके , सेजल शिंपी आदी उपस्थित होते.

Share to